सुवर्णा संजय संदे
पुनावले, जि. पुणे
माझी कॅन्सरशी यशस्वी लढाई
मी सौ. सुवर्णा संजय संदे (रिटायर शिक्षिका) सध्या राहणार पुनावले जि. पुणे (महाराष्ट्र). मला नोव्हेंबर २०२१ साली पौटाचा कर्करोग असल्याचे तपासणीमध्ये समजून आले. अर्थातच मला आणि माझ्या कुटुंबियांना ही बाब खूपच धक्कादायक होती. कारण माझ्या आजाराने चौथी स्टेज क्रॉस केली होती. माझे खाणे, चालणे अवघड झाले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझ्यासाठी ट्रीटमेंट करणेही माझे आयुष्य कारण माझे तीन चार अवघड महिनेच राहिले होते.
त्याचवेळी आमच्या डॉक्टरांनी डॉ. रेश्मा पुराणिक मॅडम यांच्याशी कॉन्टॅक्ट करुन त्यांचेकडे जाण्यास सांगितले. आणि खरच माझ्या कॅन्सरच्या प्रवासात साक्षात परमेश्वर (God) रूपाने मॅडम भेटल्या, त्यांनी अतिशय विचारपूर्वक ट्रिटमेंट सुरु केली. या सर्व कालावधीत मला माझ्या आजाराचे स्वरूप समजले होते. तेव्हा मी सुध्दा मनाशी ठरवले कि आता न घाबरता स्वतःची विल पॉवर मजबून करून यातून बाहेर पडायचेच कॅन्सरला हरवायचेच. प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण माझ्यामुळे माझे पूर्ण कुटुंबच मानसिक त्रासात होते. डॉक्टरांनाही माझी ट्रीटमेंट करणे, मला बरे करणे हे कदाचित एक आव्हानच होते.
त्याचक्षणी आपण एका गंभीर आजाराने त्रस्त आहोत हा विचारच मी डोक्यातून काढून टाकला आणि सर्वांना घाबरून टाकणारी किमो ट्रिटमेंट आनंदाने स्विकारली. माझ्या ट्रीटमेंटमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. डॉ. रेश्मा मॅडम हरी खूप चांगल्या पध्दतीने ट्रीट करत होत्या. त्यामुळे एका महिन्यातच मला चांगलाच फरक दिसू लागला आणि मी सहा महिन्यात १००% कॅन्सर मुक्त झाले. आमचा यावर विश्वासूही नव्हता. डॉक्टराच्या प्रयत्नांना यश आले होते. परमेश्वराने मला (पुढील आयुष्याचे) खूप मोठे गिफ्ट दिले होते. कारण माझ्या पाठीशी देवाचे आशिर्वाद होतेच.
या कालावधीत मला एक वर्षाची मेडिकल लिव घेऊन घरीच रहावे लागले होते. माझ्याकडे खूप वेळ होता पण तो वेळ मी आजाराविषयी विचार करत बसण्यापेक्षा यू ट्यूबवर कॅन्सर स्पेशालिस्ट यांच्या मुलाखती पाहण्यात घालवला. पेशंटचा डाएट प्लॅन कसा असावा हे जाणून घेतले. चांगली व्याख्याने ऐकली. विचार पॉझिटीव्ह केले. त्यानतरच्या कालावधीमध्ये माझ्या पाहण्यात जर कोणी कॅन्सर पेशंट आले तर मी त्यांना भेटून त्याना घाबरून न जाता आजाराशी कशी लढाई करायची हे समजावून सांगितले. त्यामुळे इतर पेशंटना धीर येऊ लागला. अशाप्रकारे मी गेली ३ वर्षे कॅन्सरमुक्त जीवन समाधानाने जगत आहे.
माझ्या या प्रवासात मला ट्रीटमेंट करणाऱ्या डॉ. रेश्मा मॅडम, माझी काळजी घेणारे माझे कुटुंबीय, मला दुवा देणारे माझे सहकारी, नातेवाईक आणि या सर्वांचा मालिक परमेश्वर या सर्वांचे खूप खूप धन्यवाद!


